Prarambh Tours

Prarambh Tours Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prarambh Tours, Mumbai.

*प्रारंभ प्रतिष्ठान, मुंबई आयोजित*🌧️ *एक दिवसीय वर्षा सहल* 🌿*शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६*📍 स्थळ: *कोंडी धबधबा, अलिबाग*💰 ...
10/07/2026

*प्रारंभ प्रतिष्ठान, मुंबई आयोजित*

🌧️ *एक दिवसीय वर्षा सहल* 🌿

*शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६*

📍 स्थळ: *कोंडी धबधबा, अलिबाग*

💰 शुल्क: *₹१,२००/- प्रति व्यक्ती*

*शुल्कामध्ये समाविष्ट*

- ☕ सकाळचा नाश्ता
- 🍽️ दुपारचे जेवण
- ☕ सायंकाळचा चहा

*एकत्र येण्याचे ठिकाण व वेळ*

📍 ब्ल्यू कोस्ट बीच रिसॉर्ट, नागाव, अलिबाग
🕘 सकाळी ९.३० वाजता

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
*९८७०७९०११२ – रोशन सावंत*

*सूचना*

- धूम्रपान व मद्यपानास सक्त मनाई असेल.
- ज्या सहभागींकडे स्वतःचे वाहन उपलब्ध नसेल, त्यांनी एस.टी. बसने अलिबाग येथे येण्याची व्यवस्था करावी.
- इच्छुकांसाठी अतिरिक्त शुल्क आकारून खाजगी वाहनाची व्यवस्था करून दिली जाईल.
- कृपया नोंद घ्यावी की वरील शुल्कामध्ये प्रवासाचा खर्च समाविष्ट नाही.

*सहलीची रूपरेषा*

🕤 सकाळी ९.३० वा. – ब्ल्यू कोस्ट बीच रिसॉर्ट येथे उपस्थित राहणे.

☕ सकाळी १०.०० वा. – चहा-नाश्ता करून कोंडी धबधब्याकडे प्रस्थान.

🌊 सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. – धबधब्यावर वर्षाविहार, निसर्गसौंदर्याचा आनंद व मनमुराद मजा.

🍽️ दुपारी २.०० वा. – रिसॉर्टवर आगमन.

🍛 दुपारी २.०० ते ३.३० वा. – दुपारचे जेवण.

🎶 सायंकाळी ४.०० वा. – मैफिल, गप्पा, गाणी व मनोरंजन.

☕ सायंकाळी ५.०० वा. – चहा घेऊन सहलीची सांगता व आपापल्या घरी प्रस्थान.

*चला... पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणात एक अविस्मरणीय वर्षा सहलीचा आनंद घेऊया!* 🌿🌧️

09/07/2026
02/06/2017

*चलो कर्नाळा* कर्नाळ्याचा डोंगर चढायला, व यथेच्छ पावसात भिजायला...

*प्रारंभ प्रतिष्ठान, मुंबई* आपल्यासाठी घेऊन येत आहे *सहल कर्नाळ्याची*

*रविवार दि. १८ जून २०१७*

निघण्याचे ठिकाण- *दादर (पूर्व)*

निघण्याची दिनांक व वेळ- *रविवार दि.१८ जून २०१७ पहाटे ५:३० वाजता दादरहून*

मुंबईत परत पोहोचण्याची अंदाजित वेळ- *रविवार दि. १८ जून २०१७ सायं ८.०० वा.*

*पिक अप पॉईंट* - दादर, सायन, चेंबूर नाका, मैत्रीपार्क, बीएआरसी, वाशी, जुईनगर, नेरूळ (एल.पी.),खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल

*नोंदणी शुल्क: रू. ९००/-*(समवेत *चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, कर्नाळा अभयारण्य प्रवेश शुल्क, व खाजगी नॉन एसी बस प्रवास*)

नोंदणी करण्याची शेवटची दि. *८ जून २०१७.* (रू.६००/- (विनापरत) भरून आगाऊ नोंदणी आवश्यक).

*८ जून २०१७ पर्यंत येणाऱ्या नोंदणीस प्राधान्य..*

*सूचना: कार्यक्रमात कोणत्याही क्षणी परिस्थितीप्रमाणे बदल होऊ शकतात.*

*सूचना- किल्ला चढण्यास अंदाजे दीड तास लागतो*

*धुम्रपानास व मद्यपानास सक्त मनाई असेल.*

अधिक माहितीसाठी संपर्क:

*रोशन सावंत- 9870790112*
*अंकिता परब- 9004237563*
*सोनल राणे-7208130612*
*शीला डोर्लेकर-9820795762*

आपले विश्वासू,
*प्रारंभ प्रतिष्ठान*

मित्रांनो,चला पावसाची मजा लुटायला, निसर्ग जवळून अनुभवायला, धबधब्यामध्ये भिजायला, नदीत डुंबायला....प्रारंभ प्रतिष्ठान आपल...
31/07/2016

मित्रांनो,

चला पावसाची मजा लुटायला, निसर्ग जवळून अनुभवायला, धबधब्यामध्ये भिजायला, नदीत डुंबायला....

प्रारंभ प्रतिष्ठान आपल्यासाठी घेऊन येत आहे एकदिवसीय सहल

दिनांक : २८ ऑगस्ट २०१६
ठिकाण : सोंडेवाडी (ता-खालापूर)
प्रस्थान : रविवार दि. २८ ऑगस्ट सकाळी ५.३० वा. दादरहून (प्रितम हॉटेल) खाजगी बसने ( नॉन ए.सी.)
शुल्क : रू. ९००/- (प्रवास, चहा-नाष्टा, दुपारचे जेवण इ. समवेत)

मर्यादित जागा...त्वरा करा...

रु. ५००/- (विनापरत) भरून आगाऊ नोंदणी आवश्यक

नावनोंदणीसाठी शेवटची दि. १० ऑगस्ट २०१६

नावनोंदणी व अधिक माहितीकरीता संपर्क:

८०८२६९४९९३- सिद्धेश सावंत.

सूचना-धुम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई असेल.

12/03/2016

मंडळी नमस्कार,
आपण 2 एप्रिल रोजी मुंबई दादर येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत.............."जमिनीचा सात बारा" .........
या विषयावर 3 तासाचा कार्यक्रम घेत आहोत. हा विषय फार महत्वाचा आहे. पत्ता: रामभाऊ म्हाळगी हॉल, चंचल स्मृती बिल्डिंग, 1ला माळा, वडाळा उद्योग भवन जवळ, शारदा टॉकीजच्या पुढे, दादर पूर्व.
आपल्या कोकणात जमीन एकतर गुंठ्यात असते त्यात 3 ते 4 पिढया वाटप झालेले नसते त्यामुळे जर शेतीमध्ये काही करायचे म्हटले तर त्या सात बाऱ्यावर हि मोठी यादी असते. त्यात कुणी काय करायचे म्हटले तर सातबाराच्या अडचणी समोर येतात. जमीनिचा विकास करायचा म्हटले कि प्रथम तिचा सातबारा क्लिअर असणे जरुरी आहे. त्यामुळे सातबारा हा विषय समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आपण जर आपली जमीन कसत नसू तर ती सुरक्षितपणे भाडेतत्वावर देता येते...आपण सामुदायिक शेतीचा मार्ग अवलंबू शकतो.
तसेच या कार्यक्रमात हे पण जाणून घ्याल कि आपली जमीन आपण कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो तसेच सातबारा आपल्या नावे असण्याचे इतरही अनेक फायदे आहेत, जसे सरकारी योजना, कर्ज, सवलती...
त्यामुळे हा कार्यक्रम ज्यांची गावी जमीन आहे त्यांनी अजिबात विसरू नका. सर्वाना हि महत्वाची माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम मोफत ठेवलाय... आजच आपलं नाव रजिस्टर करून ठेवा जेणेकरून जागा फुल झाल्या तर प्रवेश नाही मिळायचा...त्यासाठी खालील नंबरवर बस एक sms अथवा whatsup करा कि मी येत आहे आणि....माझं नाव आहे. Thats it...किंवा कॉल करून नाव नोंदवा.9869154854/9967410081...

अजय यादवराव
अध्यक्ष - समरसेट फाऊंडेशन

08/01/2016

" कोकण अनुभवूया, सेल्फी काढूया " , कोकण प्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकण अनुभवण्याची संधी दिनांक १४ ते १८ जानेवारी २०१६ रोजी काळाचौकी - लालबाग इथे . प्रवेश विनामुल्य
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 9930365566 / 9029996949
आयोजक : सुशांत लांबे , वैभव लांबे, सचिन पिळणकर
internationalkokanfestival.com

31/12/2015

.....2015....
साल ज़रूर बदल रहा है

लेकिन साथ नहीं .....

स्नेह सदैव बना रहे 🙏🙏🙏

🎤🍹🌠🎈🎊 2016

सावंतवाडीचा उभा बाजार....        सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी शहरात सरळसोट चढणीवर लाकडी खेळण्यांचा बाजार वसलेला पाह...
24/11/2015

सावंतवाडीचा उभा बाजार....

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी शहरात सरळसोट चढणीवर लाकडी खेळण्यांचा बाजार वसलेला पाहायला मिळतो. सर्व प्रकारची लाकडी फळे, लाकडापासून बनविलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू मिळण्याचे हे एकमेव ठिकाण. तेथून थोडे पुढे आले की चितार आळीत, लाकडी व स्टोन प्रकारातले नानाविध अँटिक्स मन आकर्षित करतात. श्री.अमित चितारी यांनी जे.जे.आर्टस् मधून डीग्री मिळवून फाईन आर्टसचा वापर करुन, हस्तकौशल्याने तयार केलेले अँटिक्स पाहून, सर्वच वस्तू घेण्याचा मोह होत होता. कोकणातल्या या युवकाने मारलेली ही उद्योगभरारी, फाईन आर्टसचा केलेला व्यावसायिक वापर पाहून त्यांच्या कलेला लोकांपर्यंत पोचवून, प्रारंभच्या शुभचिंतकांना या वस्तू घरबसल्या स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याचे आम्ही ठरवले. श्री.अमित चितारी आणि प्रारंभच्या संयुक्त प्रयत्नाने या वस्तू आपण आपल्या मागणीनुसार बनवून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
८०८२६९४९९३

20/11/2015

चकदेवची जत्रा....
खेड येथील रघुवीर घाट येथून साधरण ४० km वर चकदेव ह्या गावाचे अस्तित्व आहे. रत्नागिरी व सातारा ह्याच्या सीमेवर (डोंगरावर) हे गाव आहे. एका बाजूला रत्नागिरी तर दुसरया बाजूला सातारा जिल्हा आहे. तरीही हे गाव सातारा जिल्ह्यात मोडतं. निसर्ग रम्य परिसरात ह्या गावाचा वास आहे.
चकदेव हे एक खेडेगाव आहे. येथे २० घरांचा समूह आहे.
गावाच्या आवारात पूर्वकालीन (शिवकालीन) मंदिर आहे. ह्या मंदिराचे नाव "श्री शैल्य चौकेश्वर मंदिर" असे आहे. येथील देवाचे नाव "चौकेश्वर" आहे. हे मंदिर २००० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराचे पूर्ण दगडी बांधकाम आहे. वनवासादरम्यान श्री. राम यांनी एक रात्र ह्या मंदिरात वास्तव्य केले होते.
मंदिरात सात मुर्ती आहेत. राम लक्ष्मन भारत राम्वार्दयीनी
येथे एक स्वयंभू चौकेश्वर देवाची पिंड आहे.
मंदिराचे मागील बाजूस गावकऱ्यांच्या सहकार्याने मरी आईचे मंदिर बांधलेले आहे

या गावाची खासीयत म्हणजे :-
रामकाटा चे शीत पाणी
दिपमाळ
शिड्या
धनगरवाडा
राजगिर्याची भाजी

गावातील सण :
शिमगा
गणपती
एकादशी यात्रा

येत्या 23 तारखेला म्हणजे सोमवारी चकदेवची मोठी जत्रा आहे...येताय जत्रेला.?
ही जत्रा दरवर्षी दिवाळी मध्ये असते.....संपता संपता...

Address

Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prarambh Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share